अहमदनगर

नगर : ‘आयपीएल’वर सट्टा घेणार्‍या बुकीला अटक

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : आयपीएलच्या सामन्यावर सट्टा घेणार्‍या बुकीविरुद्ध गुन्हा दाखल करून कोतवाली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ऋषिकेश बाळासाहेब आहेर (वय 31, रा.भोसले आखाडा, बुरूडगाव रोड) असे त्याचे नाव आहे. पोलिस अंमलदार अमोल गाढे यांनी फिर्याद दिली. मोबाईल व रोख रक्कम असा 12 हजार 760 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ऋषिकेश आहेर हा आयपीएलच्या सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. त्याआधारे त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने गुरुवारी रात्री उशिरा बुरूडगाव रोड परिसरात छापा टाकला असता ऋषिकेश सट्टा घेत असताना मिळून आला. पोलिस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदीप थोरात, अमोल गाढे यांनी ही कामगिरी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT