नगर : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा 1 मताने पराभव करत बँकेवर भाजपची सत्ता स्थापित केली. चेअरमन पदाची निवड मतदानाद्वारे झाली, चंद्रशेखर घुले(मविआ) विरुद्ध शिवाजीराव कर्डिले(भाजपा) अशी लढत झाली.
बँकेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे उदय शेळके यांच्या निधनामुळे रिक्त जागेसाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणूकीत भाजपचे कर्डीले याना 10, तर महाविकास आघाडीचे घुले यांना 9 मते मिळाली, एक मत बाद झाले ,शिवाजीराव कर्डिले दहा मते घेवून विजयी झाले. या आधी बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता होती.