अहमदनगर

Nagar : शिर्डीत भाजपाचे जोडे मारो आंदोलन

अमृता चौगुले

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे सुपुत्र तथा कर्नाटक विधानसभेचे सदस्य प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान केले. यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याने त्यांनी शुक्रवारी शिर्डीमध्ये जोडे मारो आंदोलन केले. शिर्डीत नगर- मनमाड महामार्गावर शिर्डी- नगर परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपचे उत्तर उपजिल्हाध्यक्ष अशोक पवार, किरण बोराडे, योगेश गोंदकर, रविंद्र गोंदकर, श्रीराम आहेर, किरण बर्डे, सचिन भैरवकर, गणेश सोनवणे, सतिष गायकवाड, प्रसाद शेलार, अक्षय मुळे, विशाल पवार, राहुल घुले, राजु बलसने, ऋषी कोंडिलकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कर्नाटक विधानसभेचे सदस्य प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलविधान केले होते. यावर शिर्डीतील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ज्यांना देशाला स्वातंत्र्य देण्यास काळा पाण्याची शिक्षा भोगावी लागली, त्यांचा अपमान वारंवार काँग्रेस करते. अशा सावरकर विरोधी भूमिका असणार्‍या पक्षासोबत जाणार का,त्याच्यासोबत युती योग्य आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांना केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांच्या सूचनेवरून हे आंदोलन केल्याचे भाजयुमो पदाधिकार्‍यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT