अहमदनगर

नगरमधील बीड कॉर्नरचे नाव आता धर्मवीर छ. संभाजी महाराज मार्ग ; शिवप्रेमींकडून स्वागत

अमृता चौगुले

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : बीड कॉर्नरचे नाव आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग असे करण्यात आले.यावेळी शिवप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक दिवसांपासून सर्व शिवप्रेमींची मागणीनुसार (बिड कॉर्नर) ते मोरे वस्ती या सदरील रोड ला अनेक नावांनी ओळखले जात होते. जुना शिऊर रोड, तहसील रोड, पोलिस स्टेशन रोड, आय. सी. आय. सी बँक रोड त्यामुळे या मार्गाला विशिष्ट अशी एक ओळख नसल्याने जामखेडमध्ये शासकिय कामासाठी बाहेर गावावरून येण्यार्‍या लोकांची गैरसोय होत होती. त्यामुळे या मार्गाला सर्व समावेशक असे एकच नाव किंवा ओळख असावी, अशी सर्व शिवप्रेमींची मागणी होती. त्यानुसार (बीड कॉर्नर) ते पोलिस स्टेशन या मार्गाचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग करण्यात आले.जामखेड मधील समस्त शिवभक्तांच्या मागणीनुसार हे नामकरण रविवारी करण्यात आले.

सुरुवातीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. त्यानंतर 90 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक शाहूराव बाबुराव राळेभात व आप्पासाहेब घोलप यांच्या हस्ते मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड या संकल्पनेनुसार अतिशय सुंदर असे नामकरणाचा फलक लावून या मार्गाचे सुशोभीकरण देखील होत आहे व रयतेचे राजे छत्रपती संभाजी महाराजांचे नाव या मार्गाला दिल्याने सदरील मार्गाची विशेष अशी ओळख निर्माण होईल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
यावेळी सर्व शिवभक्त, धारकरी, व श्री शिवराज्याभिषेक उत्सव समिती चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. फलकाचे उद्घाटन झाल्यानंतर शेवटी शिवरायांचे आठवावे रुप व प्रेरणा मंत्र घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

यावेळी शिवप्रतिष्ठान तालुका प्रमुख पांडुरंग भोसले बोलताना म्हणाले की, या मार्गाला अनेक नावाने ओळखले जात होते परंतु जामखेडच्या सर्व शिवभक्तांच्या मागणीनुसार या मार्गाचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग असे करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक आप्पासाहेब घोलप व शाहूराव बाबुराव राळेभात यांनी या संबंधित मार्गाचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज केल्यामुळे आनंद वाटला आणि हा उपक्रम चांगला आहे असे उपक्रम यापुढे घ्यावेत, आम्ही सर्व तरुणांच्या मागे आहोत, असे मनोगत व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT