अहमदनगर

नगर : महावितरण अधिकार्‍यांना मारहाण

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : थकीत वीजबिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या सहायक अभियंत्यासह इतर तीन कर्मचार्‍यांना दोन भाडेकरूंनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक अभियंता स्वप्निल संजय उल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्तार शेख, शब्बु शेख (रा.भिस्तगल्ली, माळीवाडा) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींची नावे आहेत. सहायक अभियंता स्वप्निल उल्हे यांच्यासह तंत्रज्ञ अविनाश भोसले, मुबशीर सय्यद, अमित गायकवाड हे थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी भिस्तगल्ली येथे गेले होते. जानसाहेब सरदार यांची थकबाकी असल्याने वसूली पथक तेथे गेले होते.

त्याठिकाणी मुक्तार शेख, शब्बु शेख हे दोघे भाडेकरू म्हणून राहत होते. महावितरणच्या वसूली पथकाने थकबाकी भरण्याचे सांगितले असता त्यांनी हुज्जत घालत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. शब्बु शेख याने सहायक अभियंता स्वप्निल उल्हे यांना हाताने व लाथाने मारहाण केली. तसेच मिटर काढत असताना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT