संगमनेर/संगमनेर शहर; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजात अनेक कुटुंबांची अर्थव्यवस्था अत्यंत कठीण आहे. त्यांच्या आरक्षणाला इतर समाजाचाही पाठिंबा आहे. या आरक्षणासाठी सरकारने लवकरात- लवकर लक्ष घातले पाहिजे. यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केली. मराठा आरक्षणाविषयी सुरू असलेल्या आंदोलनांबाबत आ. थोरात बोलत होते. ते म्हणाले की, मराठा आरक्षण मिळावे, ही जनभावना आहे.
मराठा समाजात अनेक कुटुंबांची अर्थव्यवस्था अत्यंत कठीण आहे. या समाजातील तरुणांचा रोजगारीचा प्रश्न वाढला आहे. यामुळे आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा या तरुणांना असणे साहजिकच आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला इतर समाजाचाही पाठिंबा आहे. त्यामुळे या सगळ्या जन भावनांचा विचार करून सरकारने आरक्षणाबाबत लवकरात- लवकर निर्णय घेतला पाहिजे.
याबाबत विशेष अधिवेशन बोलून आरक्षणाबाबत ज्या काही पूर्तता करायच्या असतील त्या पूर्ण करून लवकरात- लवकर आरक्षण द्यावे, अशी आग्रही मागणी आ. थोरात यांनी केली. निळवंडे पुनर्वसन प्रश्न सोडवून अडचणींवर मात करून धरण पूर्ण केले. कालव्यांची कामे करून पाणी आले. शेतकर्यांच्या शेतात पाणी आल्याचे समाधान आहे. यामुळे उद्घाटन कोणी केले, हा प्रश्न येत नसून, शेतकर्यांना पाणी मिळाल्याचा आनंद आहे. कामाचे सार्थक झाल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी एका सभेमध्ये ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांना गुरु म्हटले होते. मग ते गुरुवर टीका कशी काय करू शकतात, असा सवाल करुन खा. शरद पवार यांनी कृषी क्षेत्रासह शेतकर्यांसाठी मोठे योगदान दिले आहे. देशाचे राजकारण व समाजकारणात त्यांचे मोठे योगदान आहे. काहीही टीका केली तरी त्यांचे देशाच्या राजकारणासह समाजकारण व शेतकर्यांसाठी मोठे योगदान आहे, हे सर्वांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही, असे आ. बाळासाहेब थोरात यांनी ठणकावून सांगितले.
हेही वाचा