टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सध्यस्थितीत लाडकी बहीण योजनेचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मोठ्या प्रमाणात महिलांच्या खात्यावर राष्ट्रीयकृत बँकामध्ये डीबीटीद्वारे पैसे जमा होत आहे. मात्र बहुतांशी महिलांचे खाते बंद असल्याने केवायसी करूनही बरेच दिवस उलटले मात्र खाते सुरू होण्यास विलंब होत असल्याने पैसे खात्यातच पडून असल्याने महिलांमधून नाराजीचा सूर दिसून येत आहे.
सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात योजनांचा पाऊस पडत आहे.. राज्यसरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा होत आहे. बहुतांश महिलांचे खाते आर्थिक व्यवहार होत नसल्याने बंद पडले होते.
खाते सुरू करण्यासाठी केवायसी करण्याकरीता बँकेत लाडक्या बहिणींनी दिवसभर काम सोडून बँकेकडे कागदपत्रे देऊन केवायसी केली. मात्र केवायसी होवून महिनाभराचा कालावधी उलटून गेला असला तरी खाते सुरू झाले नाही.
त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा असूनही खाते बंद असल्याकारणाने ते पैसे काढता येत नाही. बँकेकडून केवायसी पुर्तता केलेल्या महिलांना पुन्हा केवायसी करावी लागेल,
असेही सांगीतले जात असल्याने महिला वर्ग त्रस्त झाला आहे. याबाबत सरकारी पातळीवरून योग्य ती कारवाई करून केवायसी प्रक्रियेला गती प्राप्त करून बंद पडलेले खाते लवकरात लवकर कसे सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
Here are the meta keywords in English for the provided headline:
"Ladki Behen scheme Maharashtra, DBT payments, women bank accounts issue, KYC delay, nationalized banks, account closure problem, funds pending, women dissatisfaction, Maharashtra government scheme, financial assistance delay, women empowerment scheme"