नगर : पुढारी वृत्तसेवा : स्मशानभूमी व दफनभूमीसाठी माझी सावेडीतील सर्व्हे. 261/अ/1 जमिनीवर आरक्षण टाकणे व संपादीत करणे मनपाच्या विचाराधीन आहे. मात्र, त्या विषयावरून माझ्यावर तथ्य नसलेले आरोप करण्यात आले. मनपाने इतत्र जमीन मिळत असल्यास त्यांनी घ्यावी. त्यास माझी हरकत नाही. समाजसेवकांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही, असा दावा जमीन मालक शिवाजी कराळे यांनी केला आहे. कराळे यांनी पत्रकात म्हटले, स्मशानभूमी व दफनभूमीसाठी माझी सावेडीतील सर्व्हे. 261/अ/1 जमिनीवर आरक्षण टाकणे व संपादीत करण्यासाठी महासभेत ठराव घेण्यात आला.
त्यावर काही तथाकथित समाजसेवकांनी माझ्या पत्नीचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली. गेल्या 40 वर्षांपासून शहरात समाजकारण व राजकारण करीत आहे, असे तथ्य नसलेले आरोप कधीही झाले नाही. मनपाने विचारणा केली त्यास तत्वतः संमती दिली. त्यास कोणताही आग्रह नव्हता. उलटपक्षी प्रतिसादात शक्यतो माझी जमीन घेऊन नका असे नमूद केले आहे. आरोप केवळ बदनामी केले जात आहेत. नागरिकांना महापालिकेने केलेला प्रस्ताव रूचला नसल्यास योग्य त्या जमिनीची मागणी करण्यात यावी असे कराळे यांनी म्हटले आहे.