अहमदनगर

अकोले : राजूर पोलिसांचा एसपींकडून गौरव

अमृता चौगुले

अकोले, पुढारी वृत्तसेवा: उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा पोलिस प्रशासनाकडून राजूर पोलिस पथकाचा गौरव करण्यात आला. राजूर पोलिस स्टेशन हद्दीत मागील 2 महिन्यात शेतकर्‍यांच्या विद्युत मोटार चोरीसह चंदनाची झाडे तोडून चंदन चोरी केल्याचे प्रकार घडले होते. राजूर पोलिस स्टेशन येथे विविध कलमांन्वये 5 गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करून अल्प काळात गुन्हे उघडकीस आणले. आरोपी निष्पन्न करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल , चोरी करण्यास लागणारे साहित्य व वाहने असा एकूण 2 लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या उत्कृष्ट कामगिरीमुळे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी राजूर पोलिस ठाण्याचे स.पो. नि. नरेंद्र साबळे, पो. अंमलदार कैलास नेहे, विजय मुंढे, प्रकाश भैलूमे, दिलीप डगळे, अशोक गाढे, अशोक काळे, विजय फटांगरे, राकेश मुलाने, पांडुरंग पटेकर यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव केला. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने व जिल्हा पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT