अहमदनगर

अकोले : ग्रा.पं.निवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘वरचष्मा’

अमृता चौगुले

अकोले (नगर ) : पुढारी वृत्तसेवा  :  तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत 11 पैकी 9 राष्ट्रवादी तर भाजपाचे 2 ताब्यात आल्या आहेत. तर आ. डॉ. किरण लहामटे, जि. प. चे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, जिल्ह. बँकचे संचालक सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखाली 9 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला आहे. अकोले तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सोमलवाडी व शिळवंडी सरपंच बिनविरोध झाले. तर 9 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 25 उमेदवार व 7 ग्रामपंचायत 50 सदस्यपदासाठी 101 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. रविवारी दि. 18 रोजी सरासरी 80 टक्के मतदार झाले आहे.

तर मंगळवारी दि.20 डिसेंबर रोजी अकोले तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन लोकनियुक्त सरपंचपदी पार्बताबाई कोंडीबा गंभीरे (सोमलवाडी बिनविरोध, राष्ट्रवादी), पुनाबाई ज्ञानेश्वर साबळे, (शिळंवंडी, बिनविरोध, राष्ट्रवादी), वनिता मनोहर भांगरे (शेंडी, राष्ट्रवादी), सुशीला जिजाराम खोकले, (आंभोळ, राष्ट्रवादी), सखाराम मनोहर आस्वले (मुरशेत, राष्ट्रवादी), सुरेखा रामदास शेळके (चास, राष्ट्रवादी), दशरथ माधव उगले (डोंगरगाव, राष्ट्रवादी), अनिता विनयाक खाडे (भंडारदारा, राष्ट्रवादी), अनिता किशोर गोडसे (लहित खुर्द, राष्ट्रवादी), गजानन त्रिंबक कातडे (गुंहिरे, भाजपा), राजाराम भगवंता झंडे (वाकी, भाजपा) आदी विजयी झाले आहेत.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांचे गाव असलेले शेंडी ग्रामपंचायत व गुहिरे ग्रामपंचायतीत सदस्य पदाच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर शेंडी ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या वनिता मनोहर भांगरे यांनी भाजपाच्या मंदाबाई तुकाराम भांगरे यांचा 83 मतांनी पराभव करुन पुन्हा शेंडी ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, माजी पंचायत समिती सदस्य दिलीपराव भांगरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे. परंतु अकोले तालुक्यातील भाजपाचे माजीमंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड,राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच व सदस्य पदासाठी अनेकांनी उमेदवारी करत निवडणूक लढवली होती.

पण मात्र 11 ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदी पार्बताबाई कोडीबा गंभीरे, सोमलवाडी (राष्ट्रवादी), पुनाबाई ज्ञानेश्वर साबळे, शिळंवंडी, (राष्ट्रवादी) बिनविरोध झाल्या होत्या . तर उर्वरित आंभोळ, भंडारदरा, चास, डोंगरगाव, गुहिरे, लहित बुद्रुक, शेंडी, वाकी, मुरशेत या 9 ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी मंगळवारी तहसील कार्यालयात पार पडली. अकोल्याचे तहसीलदार सतीश थेटे, नायब तहसीलदार ठकाजी महाले स.पो.नि.मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT