अहमदनगर

नगर: मृत शेळ्यांच्या मालकास मदत द्या : आ. लहामटे

अमृता चौगुले

अकोले, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील निंब्रळ येथील उमाजी खंडू पथवे यांच्या मालकिच्या 4 शेळ्यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही घटना समजताच आ. डॉ. किरण लहामटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पथवे कुटुंबियांना शासकीय मदत देण्याच्या सुचना अधिकार्‍यांना केल्या.

दोन दिवसांपूर्वी निंब्रळ परिसरात अवकाळी पावसात वीज पडल्याने निंब्रळ परिसरात 4 शेळ्या मृत पावल्या. शेळ्यांचे मालक उमाजी पथवे यांची भेट घेऊन महसूल व आदिवासी विभागाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची सूचना संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना आ. डॉ. लहामटे यांनी केल्या. यावेळी प्रभारी गट विकास अधिकारी चौरे, तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक धिंदळे, देवेंद्र शेंडे, सरपंच उल्हास पथवे, उपसरपंच अनिल वाकचौरे, संतोष वाकचौरे, पुनाजी पथवे, विलास वाकचौरे, सुभाष वाकचौरे आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT