लोणावळा अँडवेनचर ट्रेकर्सच्या गणेश गिध यांच्या नेतृत्वाखाली हेमंत जाधव,अरमान मुजावर,धनाजी पनाळे,ओम उगले,आशिष गुंजाळ या रेस्क्यू टीमने ही मोहीम फत्ते केली. pudhari photo
अहमदनगर

Ahmednagar: हरिश्चंद्र गड कोकणकड्याच्या १८०० फुट खोल दरीत सापडला सांगाडा

लोणावळा अँडवेनचर ट्रेकर्सची यशस्वी कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

अकोले : गड - किल्ले म्हणून पर्यटक स्थंळ असलेल्या हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्याच्या सुमारे १८०० फुट खोल दरीत दोन तरुणांचे सांगाडे आढळून आले असून या दोनही तरुणांच्या सांगाड्यांची ओळख राजूर आणि टोकावडे पोलिसांना पटलेली आहे.

दरम्यान, लोणावळा अँडवेनचर ट्रेकर्सच्या गणेश गिध यांच्या नेतृत्वाखाली हेमंत जाधव,अरमान मुजावर,धनाजी पनाळे,ओम उगले,आशिष गुंजाळ या रेस्क्यू टीमने ही मोहीम फत्ते केली. मात्र शोधायला गेले एक मृतदेह अन दोघा जणांचे सांगाडे सापडल्याने खळबळ माजली आहे. अजूनही कळसूबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात बेपत्ता तरुण - तरुणींचे अवशेष सापडण्याची शक्यता आहे.

अन् विस्कटलेली हाडे रेस्क्यू टीमला दिसली

अकोले तालुक्यातील राजुर पोलीस ठाण्यात १८ जून २०२४ महिन्यात रोहित श्रीपाद सोळुंके वय २२ रा. सिल्वासा, दादरा नगर हावेली यांची मिसिंग तक्रार दाखल होती, रोहित सोळुंके हा ट्रेकिंगसाठी कळसुबाई शिखरावर आला होता,मात्र तो परत घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी राजुर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली होती,परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यातच कोकणकड्यावर मान्सून सक्रिय झाला अन पोलीस व ट्रेकर्सना रोहित सोळुंकेचा शोध घेता आला नाही.त्यामुळे रोहितचा शोध काही लागू शकला नाही. ही सर्व हकीकत वरती असलेल्या पोलिसांना रेस्क्यू टीमने कळवली. मात्र रेस्क्यू टीमने आजूबाजूला शोधमोहीम सुरूच ठेवली. यावेळी आधीच्या सांगाड्यापासून २५ ते ३० मीटर अंतरावर पुन्हा एक सांगाडा मिळून आला.हा सांगाडा रोहित सोळुंके याचा असल्याची खात्री रेस्क्यू टिमने केली.यावेळी विरलेल्या अवस्थेतील टीशर्ट त्याच्या शेजारी विस्कटलेली हाडे रेस्क्यू टीमला दिसून आली.

पाऊस उघडल्याने राजूर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. दीपक सरोदे यांनी लोणावळा अँडवेनचर ट्रेकर्सना मृतदेह शोधण्याची विनंती केली.त्यानंतर लोणावळा अँडवेनचर ट्रेकर्सने कोकणकड्यावर येऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.सुमारे १८०० फूट खोल दरीत दोरीच्या साहाय्याने उतरून ट्रेकर्स टीमने आपले रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.यावेळी या टीमला एक जीर्ण झालेला सांगाडा आढळून आला,या सांगाड्याची जवळून पाहणी करत असताना टीमच्या सदस्यांना गणेश उमेश होनराव या नावाचे आधारकार्ड व पॅनकार्ड आणि तुटलेली हाडे सापडली.मात्र रेस्क्यू टिमला तर रोहित साळुंखे याच्या अवशेशाची शोधमोहीम घ्यायची होती.त्यामुळे आपण शोध एकाचा घ्यायला आलो अन सापडला दुसरा अशी परिस्थिती यावेळी निर्माण झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT