अहमदनगर

अहमदनगर मनपाला हवेय फाईव्ह स्टार मानांकन!

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा

स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या अभियानामध्ये अहमदनगर महापालिकेने फाईव्ह स्टार मानांकनासाठी सहभाग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये स्वच्छतेच्या विविध उपाययोजना सुरू आहे. स्वच्छतेबाबत महापालिकेने सर्व पूर्वतयारी करून ठेवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ, सुंदर, हरित शहर बनविण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. या माध्यमातून नगर शहराने स्वच्छतेसंदर्भात कात टाकली आहे. शहरामध्ये गेल्या तीन वर्षांपासून स्वच्छतेच्या विविध उपाययोजना करून शहर कचराकुंडी मुक्त झाले आहे.

त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध मानांकन मिळाले आहेत.आता महापालिकेने फाईव्ह स्टार मानांकनासाठी सहभाग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची स्वच्छ सर्वेक्षणाची टीम दाखल झाली आहे. ते अचानकपणे शहरात विविध भागात जाऊन भेटी देत आहेत. त्यामुळे स्वच्छतेबाबत महापालिकेने सर्व पूर्वतयारी केली आहे.

SCROLL FOR NEXT