अहमदनगर

बाळासाहेब ढेरे बिनविरोध; अहमदनगर जिल्हा स्टाफ को-ऑपरेटिव्ह सोसायटी निवडणूक

अमृता चौगुले

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्हा स्टाफ को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालकपदी कर्जत येथील बाळासाहेब ढेरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी असणार्‍या जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचार्‍यांची अहमदनगर जिल्हा स्टाफ को-ऑपरेटिव्ह सोसायटी पतसंस्थेची निवडणूक सुरू आहे. 21 संचालक या निवडणुकीमध्ये निवडले जाणार असून, यामध्ये 17 संचालक मंगळवारी बिनविरोध निवडले गेले आहेत. यामध्ये कर्जत तालुक्यातून बाळासाहेब ढेरे यांचा समावेश आहे. सोसायटीमध्ये तब्बल 63 वर्षांनी कर्जत तालुक्याला प्रथमच संचालक पदाची संधी मिळाली आहे.

चार जागांसाठी 5 फेब्रुवारी या दिवशी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. ढेरे हे बिनविरोध विजयी झाल्याचे वृत्त समजताच कर्जत येथील जिल्हा सहकारी बँकेसमोर सर्व कर्मचार्‍यांनी एकत्र येत फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला. बाळासाहेब ढेरे यांच्या निवडीचे कर्जत तालुका विकास अधिकारी संजय शेळके, कार्यालयीन अधीक्षक प्रदीप सातपुते व बँक निरीक्षक लहानु मच्छिंद्र यांच्यासह सर्व कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT