बेलापूर येथे कोयत्याने वार करून दोन महिलांचा निर्घृण खून करण्यात आला.  File Photo
अहमदनगर

अहिल्यानगर हादरले: २ भावजयांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून, दीर फरार

पुढारी वृत्तसेवा

अकोले, पुढारी वृत्तसेवा: बेलापूर (ता. अकोले) येथे गजबजलेल्या भर वस्तीत एका माथेफिरूने किरकोळ जमिनीच्या व पैशाच्या वादातून आपल्या दोन भावांच्या पत्नी वर धारदार कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. ही घटना आज (दि.७) भर दुपारी एक ते दोनच्या सुमारास घडली. दत्तात्रय प्रकाश फापाळे उर्फ बापू (रा. बेलापूर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Ahmednagar News)

उज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे (दोघी रा. बेलापूर बदगी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) अशी खून झालेल्या महिलांची नावे आहेत.

त्या घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. बेलापूरचे माजी पोलिस पाटील शिवाजी फापाळे, पोलिस पाटील राहुल अकोले यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच अकोले पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी पोलिस किशोर तळपे, पोलिस गोरे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. (Ahmednagar News)

संशयिताची आई फुलाबाई प्रकाश फापाळे यांच्या डोळ्यासमोर ही घटना घडली असून तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. किरकोळ पैशाच्या व जमिनीच्या वादावरून कोयत्याने वार करत दोन्ही भावजयांचा निर्घृण खून केला आहे. पुढील तपास अकोले पोलीस करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT