अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये निकालाचे चित्र स्पष्ट झाले असून याठिकाणी २० जागा मिळवत राष्ट्रावादीने सर्वात मोठा विजय संपादन केला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करणारा माजी नगरसेवक श्रिपाद छिंदम विजयी झाला आहे. छिंदम हा बहूजन समाजवादी पक्षाकडून महापलिकेच्या रिंगणात होता. राष्ट्रवादी खालोखाल भाजप १६ जागा मिळवत दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ८ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना उबाठा गटाला आतापर्यंत केवळ १ जागा जिंकता आली आहे.
राष्ट्रवादी 20 जागांसह प्रथम स्थानी
संपत बारस्कर, सागर बोरुडे, दीपाली बारस्कर, महेश तवले, संध्या पवार, गौरी बोरकर, ज्योती गाडे, अविनाश घुले, अनिता शेटीया, सुरेश बनसोडे, सुजाता पडोळे, हरप्रित गंभीर, काजल भोसले, मोहित पंजाबी, सुनीता फुलसौंदर, मीना़ चोपडा, गणेश भोसले, प्रकाश भागानगरे-बिनविरोध, सुनीता महेंद्र कांबळे, वर्षा सुजित काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.
भाजप 16 जागासंह दुसऱ्या स्थानावर
शारदा ढवण, निखील वारे, रोशनी भोसले, ऋगवेद गंधे, धनंजय जाधव, महेश लोंढे, मनोज दुलम, सुनीता कुलकर्णी, करण कराळे-बिनविरोध, सोनाबाई शिंदे, वंदना ताठे, बाबासाहेब वाकळे, वर्षा सानप, पुष्पा बोरुडे -बिनविरोध, अमोल येवले, विजय पठारे. हे भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
शिंदे शिवसेना 8 विजयी उमेदवार
बाळासाहेब बोराटे, सुरेखा संभाजी कदम, मंगल लोखंडे, दत्ता कावरे,नवनाथ कातोरे, संजय शेंडगे, रुपाली दातरंगे, वैशाली शाम नळकांडे विजयी झाले आहेत. तर उबाठा गटाचे योगिराज गाडे हे विजयी झाले आहेत. अजून ७ जागांवरील निकाल येणे बाकी आहे.
काँग्रेसच्या खान मिनाज जाफर विजयी झाल्या असून एमआयएम-3 जागावरं विजय मिळवला आहे यामध्ये समदखान, शेख शहेनाज खालीद, सय्यद शहाजाब अहमद यांचा समावेश आहे.
अनेक दिग्गजांना पराभवाचा दणका
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्यासह शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांचाही पराभव झाला असून, काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांचाही पराभव झाला आहे
अनेक माजी नगरसेवकांचा पराभव
उषा नलावडे, शिला शिंदे, विणा बोज्जा, सारीका भूतकर, सचिन शिंदे, माजी सभापती सुवर्णा जाधव (शिवसेना) यांनी महापालिकेत नगरसेवक पद भुषविले आहे. यांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारले आहे.
हे उमेदवार ठरले प्रमूख विजयी
माजी महापौर सुरेखा कदम, माजी उपमहापौर गीतांजली काळे, राष्ट्रवादीचे शहरजिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपचे सरचिटणीस निखील वारे, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी सभापती गणेश कवडे हे प्रमुख उमेदवार विजयी ठरले आहेत.