File Photo
अहमदनगर

Ahilyanagar Municipal Corporation | वारसांना तत्काळ नोकरीत सामावून घ्या

मनपा कर्मचारी युनियनचे उपायुक्तांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

नगर : पुढारी वृत्तसेवा

सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी सामावून घेण्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाल दिला होता. त्यावर शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने नुकताच आदेश काढून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याचा आदेश केला आहे.

त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार वारसांना तत्काळ नोकरीत सामावून घेण्याबाबत मनपा कामगार संघटनेतर्फे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना निवेदन आले. यावेळी अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सचिव आनंदराव वायकर, राहुल साबळे, बलराज गायकवाड, दीपक मोहिते, महादेव कोतकर,

बाबासाहेब राशिनकर, ऋषिकेश भालेराव, संदिप चव्हाण, नंदकुमार नेमाणे, अमोल लहारे, अजय सौदे, विजय कोतकर, प्रफुल्ल लोंढे, बाळासाहेब व्यापारी, सागर साळुंके, प्रकाश साठे, भरत सारवान, विठ्ठल बबन उमाप, सूर्यभान देवघडे, सखाराम पवार, अंतवन क्षेत्रे, अकिल सय्यद, राजेंद्र वाघमारे, अजित तारू, भास्कर आकुबत्तीन, राकेश गाडे, अनंत लोखंडे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १३ ऑक्टोबर २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे कोर्ट निकालान्वये कायम झालेल्या सफाई कामगारांच्या वारसांना महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत निर्णय दिला.

न्यायालयाच्या आदेशानुसार ५११- ३०५ व ७६ वारस यापैकी सफाई कामगारांच्या वारसांना तत्काळ नोकरीत सामावून घेण्याचा आदेश काढण्यात आला असून मनपात ३०३ वारस हक्क सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला. अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी युनियनने केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले. त्यामुळे त्या ३०३ कामगारांना तत्काळ नोकरी सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT