अहमदनगर

पारनेर : तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘ती’ पुन्हा येणार !

अमृता चौगुले

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्त्तसेवा : सन 2020 पासून जैविक महामारीच्या माध्यमातून शासनाने केलेले लॉकडाऊन व तेव्हापासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे आलेली मरगळ तसेच त्यामुळे तोट्यात चाललेले परिवहन महामंडळ यांनी आपल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक गावांमधील मुक्कामी बसेस बंद केल्या होत्या.

दैनंदिन कामकाजासाठी तसेच उच्च माध्यमिक माध्यमिक व इंग्रजी माध्यमातील पारनेर शहरात असणार्‍या शाळा व त्या शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच पारनेर शहरात असणारे तालुक्यातील तहसील पंचायत समिती कोर्ट-कचेरी यासारखे मध्यवर्ती शासकीय कार्यालयात खेड्यापाड्यातून पारनेरशी दैनंदिन नाळ जोडलेल्या प्रवाशांना तसेच उद्योगधंद्यासाठी आपला व्यवसाय बंद करून आपल्या स्वगृही जाणार्‍या उद्योजकांना व रात्रीच्या वेळी इतर जिल्ह्यातून येणारे ग्रामस्थांना या मुक्कामी गाड्या बंद झाल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते .

सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या अकरा गावातील पदाधिकारी नेतेमंडळी व ग्रामस्थांनी अनेक वेळा आमदार नीलेश लंके यांच्याशी संपर्क केला होता . लंके यांनीही वारंवार पारनेर आगाराचे व्यवस्थापक कोतकर यांच्याशी संपर्क करून सदर अकरा गावांमध्ये मुक्कामी बस सेवा पूर्ववत करण्याची. तोंडी व लेखी स्वरूपात मागणी केली होती.त्यानंतर ही बससेवा पूर्ववत करण्यात आली आहे. सदर बस 15 जून पासून पूर्ववत होणार असल्यामुळे गावातील व परिसरातील प्रवासी उद्योजक व व्यावसायिक मित्रांनी आमदार लंके व आगार व्यवस्थापक अमोल कोतकर यांचे आभार मानले आहे.

विद्यालयातच मिळणार आता बसचा पास

दरम्यान, आगार व्यवस्थापक अमोल कोतकर यांनी संबंधित गावाच्या मुक्कामी बसेस आपण चालू शैक्षणिक वर्षांपासून 15 जूनपासून पुन्हा सुरू करत आहोत. तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी आपल्या सुरू होणार्‍या शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थी पासेस त्वरित काढून घ्यावेत. पारनेर आगाराचे दोन वाहतूक नियंत्रक सर्व शाळा महाविद्यालये या ठिकाणी जावून विद्यार्थ्यांना पासेसचे वाटप करणार आहेत, त्यामूळे विद्यार्थ्यांना तासनतास बसस्थानकावर पास काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही तसेच महामंडळातर्फे 75 वर्ष वरील ज्येष्ठ नागरिक यांना मोफत प्रवास योजनेचा व महिला प्रवासी यांना प्रवासात 50 टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोतकर यांनी केले आहे.

मुक्क्कामी बसमुळेच मी आज वकिलः झावरे

वनकुटे मुक्कामी असणार्‍या बसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी अधिकारी व उच्चपदस्थ पदावर काम करत आहे. गरीब विद्यार्थ्यांना या बसच्या माध्यमातून रोज घरचा डब्बा मिळत होता. मात्र काही दिवसांपासून ही बस बंद झाल्याने पूर्णपणे विस्कळीतपणा आला होता. आज मी वकीली क्षेत्रात कार्यरत आहे ते फक्त पारनेर वनकुटे बस मुळेच, असे अ‍ॅड. राहुल झावरे यांनी सांगितले.

मुक्कामी बस

वरणवाडी , कोतुळ
जवळा , वासुंदे
सुरेगाव, गुणोरे
पिंपरी जलसेन डोंगरवाडी
तिखोल, कळस
वनकुटे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT