अहमदनगर

नगर : मुलीवर अत्याचार; नराधमास जन्मठेप

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि दहा हजाराच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. छबु उर्फ छबन पांडुरंग आखाडे असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर दुसरा आरोपी सुंदर उर्फ सुंदरदास आखाडेरा (चिंचोली काळदात, ता.कर्जत, जि. अहमदनगर) याची संशयाच्या अभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायाधीश एम. एस. शेख यांनी हा निकाल दिला. कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथे 10 व 26 जानेवारी 2022 रोजी आरोपी छबु उर्फ छबन पांडुरंग आखाडे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. हा प्रकार कोणाला सांगितला तर पीडितेला व पीडितेच्या आईवडीलांना जीवे मारण्याची आरोपीने धमकी दिली होती.

पीडितेच्या आईने हा प्रकार आरोपी सुंदर उर्फसुंदरदास आखाडे याला सांगितला असता, केस मागे घ्या नाहीतर तुमच्या विरूद्ध अनुसूचित जाती जमातीकायद्याखाली गुन्हा दाखल करील अशी धमकी दिली होती. पीडितेच्या आईने कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिस उपनिरीक्षक अमरजीत मोरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.  या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडिता, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी, ठाणे अंमलदार, पंच व चिंचोली काळदात येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाच्यावतीने अतिरीक्त सरकारी वकील संगिता अनिल ढगे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून आशा खामकर, गणेश काळाणे यांनी सहकार्य केले.

SCROLL FOR NEXT