अहमदनगर

नेवासा : उसाने भरलेला ट्रॅक्टर कारवर उलटला ; कारमधील तीन जण किरकोळ जखमी

अमृता चौगुले

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  ऊसाने भरलेला ट्रॅक्टर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पलटी होवून कारवर उस पडल्याने कारमधील तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना नेवासा तालुक्यातील मुरमे – देवगड रस्त्यावरील बावके वस्तीजवळ शनिवारी (दि.12) दुपारी दोन वाजता घडली. अपघातग्रस्तांना परिसरातील शेतकर्‍यांनी वेळीच प्रसांगवधान दाखवून मदत केल्याने अनर्थ टळला. त्यांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले. मुरमे येथून उसाने भरलेला ट्रॅक्टर देवगडच्या दिशेने जाताना देवगडकडे दर्शनासाठी चाललेल्या कारवर खड्ड्यांमुळे ट्रॅक्टर पलटी झाला.

कारवर उस पडल्यामुळे कारमधील तीनजण दबले गेले. या अपघातामुळे परिसरात असणार्‍या शेतकर्‍यांनी धाव घेतली. उस बाजूला सारण्यासाठी वेळीच मदत केली. या प्रसांगवधानामुळे अनर्थ टळला. या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले असून, कारचे मोठे नुकसान झाले आहे. उस वाहतुकीसाठी हल्ली डब्बल ट्रॉली ट्रॅक्टरचा उपयोग साखर कारखाने करून घेत असून, या ट्रॅक्टरवरील चालकही अल्पवयिन आहेत. मोठ्या आवाजात गाणे लावून ट्रॅक्टर चालविले जातात मागून येणारी वाहने समजत नसल्याने अपघाताची घटना होते. अशा अपघातांची संख्याही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अपघात प्रकरणी नेवासा पोल्लिसांकडे चौकशी केली असता माहिती घेवून सांगतो, असे उत्तर मिळाल्याने नेवासा पोलिसांचे पुन्हा वराती मागून घोडे दामटण्याचा प्रत्यय आला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT