अहमदनगर

नगर : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला कर्मचार्‍यांचा मशाल मोर्चा

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शनसाठी सुरू केलेला संप सोमवारी दुपारनंतर मागे घेण्यात आला असला, तरी त्याआधी सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल मोर्चा काढला होता. हातात लाल झेंडे, गळ्यात लाल उपरणे व डोक्यावर लाल टोप्या घालून पुरुष आणि लाल साड्या व ड्रेस परिधान करून महिला कर्मचारी मोेर्चात सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे, सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष उपाध्यक्ष तळेकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, किसान सभेचे बन्सी सातपुते, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित यांनी मार्गदर्शन केले. महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, विनायक देशमुख, आप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाडे, विठ्ठल उरूमुडे, बापू तांबे, परिचारिका संघटनेच्या सुरेखा आंधळे आदी सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT