अहमदनगर

‘भेंडा खुर्द’ची 28 पासून रणधुमाळी ! ग्रामपंचायतीसाठी चुरशीची निवडणूक

अमृता चौगुले

भेंडा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. दि. 28 पासून नामनिर्देशन पत्र भरण्यास प्रारंभ होणार असल्याने भेंडा येथील राजकारण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे.
भेंडा खुर्द ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्याने पारावरही राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. यात इच्छुकांची संख्या वाढती असल्याने निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दि. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत दररोज 11 ते दुपारी 3 पर्यंत वेळ देण्यात आली आहे. आलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी दि. 5 डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशन पत्र तथा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दि. 7 डिसेंबर असेल.

मतदान दि. 18 रोजी सकाळी सात ते सायंकाळी 5.30 पर्यंत होईल.निवडणुकीसाठी सर्वच स्थानिक गावपुढार्‍यांनी जोरदार मोर्चेबांधणी केल असल्याने या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष असणार आहे.

प्रभागनिहाय असे आहे आरक्षण !

भेंडा खुर्द ग्रामपंचायतीच्या 9 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. एकूण 3 प्रभागांमध्ये खालील प्रमाणे आरक्षण पडलेले आहे. प्रभाग क्रमांक 1 नागरिकांचा मागास प्रवर्ग 1, सर्वसाधारण स्री 2. प्रभाग 2 – सर्वसाधारण 1, सर्वसाधारण स्री 2. प्रभाग 3 – सर्वसाधारण 1, अनुसूचित जाती 1 आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग 1. अशप्रकारे आरक्षण असणार आहे.

SCROLL FOR NEXT