file photo 
अहमदनगर

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन अत्याचार

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीला सहा महिन्यांपूर्वी पळवून नेऊन तिच्यावर अत्यावर करून गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पीडित 15 वर्षिय अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे. संदीप राजू घोरपडे (रा. कोठला, घासगल्ली, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तू माझ्या सोबत चल नाहीतर मी तुझ्या आई-वडिलांना मारून टाकील, असा दम देऊन आरोपी पीडितेला मिरजगाव (ता.कर्जत) येथे सहा महिन्यांपूर्वी घेऊन गेला होता. त्यानंतर पीडितेच्या आईला आरोपी फोन करून दमदाटी करीत होता.

तू जर पोलिसांत तक्रार दिली तर तुझ्या मुलीला मारून टाकील, अशी धमकी दिल्याने पीडितेच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दिली नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पीडितेने तिच्या आईला फोन करून सांगितले की, संदीप हा मला मिरजगाव येथे घेऊन आला आहे, मला घरी यायचे आहे. त्यानंतर पीडितेच्या आईने मिरजगाव बसस्टॅण्डवर तिला बोलावून घेतले व माळीवाडा येथे आणले. तुझ्या आई-वडिलांना मारून टाकील, अशी धमकी देऊन आरोपीने पीडितेवर अत्याचार करून गर्भवती केले.  पीडितेच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात आरोपीविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT