संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील शिबलापूर – साकूर रस्त्यालगत बुधवारी सकाळी बिबट्याच्या बछडा मृतावस्थेत आढळून आला. वन कर्मचार्यांनी बछड्यास उत्तर तपासणी करीता संगमनेर नेले होते. उत्तर तपासणी नंतर बिबट्याचा बछडा हा तरसांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी शिबलापूर – साकूर रस्त्यावरील शिबलापूर शिवारातील जिजाबा नागरे यांच्या शेतजमीनीलगत एक बिबट्याचे बछडे झोपलेल्या अवस्थेत दिसले. नागरीकांनी थोडे जवळ जाऊन पाहिले असता बछड्याच्या तोंडातून रक्त येऊन ते मृत झाल्याचे त्याच्यां लक्षात आले.
त्यामुळे नागरीकांनी वनाधिकार्यांना फोन करून याबाबत वनविभागाला घटनेची माहिती दिली होती. भरधाव वेगाने जाणार्या अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे या पिल्लाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता. माहिती मिळाल्यानतंर वनाधिकारी सुभाष सांगळे, वनपाल सुहास उपासनी, वनरक्षक हरिचंद्र जोजर, वनमजूर देवीदास चौधरी वनविभागाचे हे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या मृत बिबट्याच्या बछड्याला वनविभागाचे कर्मचारी आपल्या समवेत घेऊन गेले असता त्यांची उत्तर तपाणी केल्यानंतर बिबट्याच्या बछड्याच मृत्यू हा तरसाच्या हल्यात झाल्याचे निष्पन्न झाले. यावेळी बिबट्याचे पिल्लू मृत पावल्याची घटना घडल्याची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिबलापूर, पानोडी, आश्वी, उंबरी बाळापूर, पिप्रीं आदिंसह प्रवरा नदी तिरावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यासह तरसांची दहशत निर्माण झाल्याने वनविभागाकडून सावध रहाण्याचे आवाहन होत आहे.
चार महिन्यांचे बछडे
बिबट्याचा बछडा हा 4 महिन्यांचा असल्याने त्याला शिकारीची माहिती नसल्यामळे तरसांच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनरक्षक हरिचंद्र जोजर यांनी दिली.