अहमदनगर

नगर : वीज कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍यावर गुन्हा दाखल

अमृता चौगुले

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : वीजचोरीचा आकडा पकडल्याचा राग आल्याने महावितरणच्या कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करीत मारहाण केल्याप्रकरणी संंतोष बर्डे याच्याविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात सरकारी कामात आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की बुधवारी दुपारी शहरातील गंगानगर व लक्ष्मीनगर परिसरात शिंदे व बाह्यस्रोत कर्मचारी रमेश तवले हे दोघे वीज खांबावर काम करीत असताना संतोष बन्सी बर्डे तेथे आला.

त्याच्या घरातील चोरीचा आकडा काढल्याचा राग मनात धरून दोघा कर्मचार्‍यांना शिवीगाळ करू लागला व रमेश तवले यांच्या दुचाकीला लाथ मारून पाडून दिली. त्यावेळी अमोल शिंदे हे बर्डे यास समजावून त्यांची गचंडी धरून धक्काबुक्की केली. तसेच बर्डे याने रमेश यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुन्हा गल्लीत आले, तर हातपाय तोडण्याची धमकी दिली. या प्रकरणी संतोष बर्डे याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT