अहमदनगर

संगमनेर तालुक्याला विकासकामांसाठी 91 लाख मंजूर

अमृता चौगुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा परिषद सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठीच्या 15 वा वित्त आयोग या योजने अंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील विकास कामांसाठी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे.

नगर जिल्हा परिषद सन 2021- 22 या आर्थिक वर्षासाठी पंधरावा वित्त आयोग या योजनेअंतर्गत रायते येथील हनुमान मंदिरासमोर सभा मंडप बांधण्यासाठी 5 लाख रुपये, वाघापूरच्या स्वामी समर्थ केंद्र ते गव्हाळी वस्ती रस्ता मजबु तीकरणासाठी 5 लाख रुपये, मालुंजे ते जुने अंभोरे रस्ता मजबुती करण्यासाठी 7 लाख रुपये, डिग्रस येथील ग्रामपंचायत कार्यालयावरती सभागृह बांधण्यासाठी 8 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

अंभोरे येथे आदिवासी वस्ती रस्ता मजबुतीकरणासाठी 6 लाख रुपये, पिंपरणे ते कनोली शिवार रस्ता मजबुतीकरण 7 लाख रुपये, घुलेवाडी कचरा व्यवस्थापण घंटागाडी खरेदीसाठी 5 लाख रुपये, चिखली येथे शिवछत्रपती स्मारक सुशोभीकरणासाठी 5 लाख रुपये, पिंपळगाव कोंजीरा येथे स्मशानभूमी सुशोभीकरण 5 लाख रुपये, वरुडी पठार येथील स्मशानभूमी सुशोभीकरण 4 लाख रुपये, तळेगाव दिघे येथील महादेव मंदिर परिसर सुशोभीकरण 5 लाख रुपये, करुले येथे विठ्ठल मंदिर सभामंडप 5 लाख रुपये, हिवरगाव पावसा खंडोबा मंदिर सुशोभीकरण पेविंग ब्लॉक करण्यासाठी 5 लाख रुपये, निमोण येथे दशक्रिया घाट सुशोभीकरणासाठी 5 लाख रुपये, वरवंडी येथील स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी 5 लाख रुपये, आणि डोळासने येथील ठाकर वस्ती अंतर्गत पाटणवाडी डुबेवाडी हे रस्ता डांबरी करण्यासाठी 9 लाख रुपये, असे एकूण 91 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

SCROLL FOR NEXT