पारनेर; पुढारी वृत्तसेवा : आपल्या धर्मासाठी काहीतरी केले पाहिजे यासाठी पिंपळनेर येथे उभारलेला 85 फूट उंचीचा शिवस्वराज्य ध्वज ग्रामस्थांना नेहमी प्रेरणा देईल, असा विश्वास आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला. शिवजयंती व आमदार लंके यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेर येथे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून 85 फूट उंचीच्या शिवस्वराज्य ध्वजाचे लोकार्पण आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले.
सरपंच देवेंद्र लतांबळे यांच्या संकल्पनेतून हा ध्वज उभारण्यात आला आहे. दरम्यान, याच धर्तीवर मांडवे खुर्द येथेही सरपंच सचिन आहेर यांनी 101 फुटांचा ध्वज उभारण्याचा संकल्प सोडला आहे. सरपंच लटांबळे पाटील, शिरूरचे माजी नगराध्यक्ष नीलेश लटांबळे, सुभाष गाजरे, चेअरमन निळकंठ सालके, सीताराम कळस्कर, मच्छिंद्र लटांबळे, योगेश कळसकर, विपुल सावंत, भाऊसाहेब खामकर, विकास रासकर आदी उपस्थित होते.