संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान गावात सध्या चोरट्यांनी घरफोड्यादुकाने फोडणार्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. याच गावातीलच दिघे यांचे प्लंबिंगच्या साहित्याचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे 67 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. गेल्या महिन्याभरापासून वडगावपान येथे चोर्यांचे आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिक चांगलेच भयभीत झाली आहे. एवढेच नाही तर घरफोड्या आणि चोर्या होऊ नयेत, म्हणून पोलिसांच्या मदतीवर न राहता गावातील तरुणांनीच रात्रीच्या वेळी गस्त घालण्याचे काम सुरू केले आहे. तरीही चोर्यांचे प्रकार थांबता थांबत नाही. त्यामुळे या वाढत्या चोर्यांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होणे खूप गरजेचे आहे, अशी मागणी आता ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.
कोल्हार -घोटी राज्य महामार्गावर असणारे आप्पा मार्केटमधील दिघे पाटील इंटरप्राईजेस या दुकानाच्या मागील बाजूने आज्ञात चोरट्यांनी पत्रे उचकटून दुकानात प्रवेश करत प्लंबिंगच्या सामानासह वेग वेगळ्या प्रकारचे स्टीलचे महागडे कॉक व इतर वस्तूंची चोरी असा एकूण 67 हजार 500रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत गिरीश भास्कर दिघे (रा. कोल्हे वाडी, तालुका संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आज्ञात चोरट्याच्या विरोधात घरपोडीचा गुन्हा दाखल केला असून याबाबतचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
शेतकर्याने केले चोरट्यांशी दोन हात
संगमनेर तालुक्यातील वडगावपान गावातील एका सोनाराचे दुकान फोडण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांना शेजारी राहणार्या एका शेतकर्याने पाहिले. आता आपल्या चोरीचा डाव उधळणार म्हणून त्या शेतकर्याला लक्ष केले. त्यामुळे चोरट्यांनी त्याच्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकर्यांनी आपल्या हातातील पाईपाने चोरट्यांशी प्रतिकार केला. त्यामुळे चोरट्यांनी या ठिकाणाहून पळ काढला.