अहमदनगर

65 वर्षांच्या व्यक्तीचा शेततळ्यात पडून मृत्य

अमृता चौगुले

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील सावरगावतळ येथील सोपान मारुती नेहे (वय 65) या नागरिकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
सावरगावतळ येथे गट नं. 655 मध्ये त्यांचे स्वतःच्या मालकीचे शेततळे आहे. काल शुक्रवारी पहाटे 5.30 च्या दरम्यान ते पाण्यासाठी आपली मोटार चालू करण्यासाठी गेले असता शेततळ्याच्या कागदावरून पाय घसरून ते शेततळ्यात पडले.

पहाटेची वेळ आणि जवळपास कोणीही नसल्याने आणि त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोटार चालू करून बराच वेळ होऊनही ते घरी पुन्हा माघारी का येईना, म्हणून त्यांचा मुलगा बाबासाहेब त्यांना पाहण्यासाठी गेला असता ते शेततळ्यात पडल्याचे त्यांना आढळून आले.

त्यांनी आजूबाजूच्या व्यक्तींना मदतीला बोलाविले असता वैभव नेहे आणि इतर ग्रांमस्थ मदतीला धावून आले आणि तत्काळ त्यांना पाण्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT