अहमदनगर

नगर : वीज बील पे ऑनलाईन ! जिल्ह्यातील 283000 हजार वीज ग्राहकांनी भरले 51 कोटी

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन पेमेंट सुविधांचा वापर करत नगरमधील 2 लाख 83 हजार ग्राहकांनी 51 कोटींचा भरणा केला. घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वर्गवारीतील राज्यातील 1 कोटी 11 लाख 53 हजार 703 लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यात ऑनलाईन पेेंटचा पर्याय स्वीकारला आहे. या ग्राहकांकडून वीजबिलाच्या भरण्यापोटी 2230 कोटी सहा लाख इतकी रक्कम भरली आहे. नाशिक परिमंडळात 8 लाख 35 हजार 874 ग्राहकांनी 160 कोटी भरले. त्यात नगर परिमंडळातील 2 लाख 83 हजार ग्राहकांकडून 51 कोटी 6 लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे.

प्रत्येक ग्राहकाला ऑनलाईन पेमेंटवर 0.25 टक्के सवलत मिळत असल्याने ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. ऑनलाईन वीज बिल भरणा करण्यात कोकण प्रादेशिक विभागाचे ग्राहक आघाडीवर असून एकूण 49 लाख 21 हजार 693 ग्राहकांनी 1001 कोटी 13 लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्या खालोखाल पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या 33 लाख 75 हजार 471 ग्राहकांनी 751 कोटी 85 लाख इतका तर नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या 19 लाख 33 हजार 256 ग्राहकांनी 299 कोटी 15 लाख इतका भरणा केला आहे. याचबरोबर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या 9 लाख 23 हजार 283 इतक्या ग्राहकांनी 177 कोटी 96 लाख इतका ऑनलाईन भरणा केला आहे.

वीज ग्राहक संगणक किंवा मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने वीज बिल भरू शकतात. त्यातून ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचतात. मोबाईल अ‍ॅप किंवा संकेत स्थळावर चालू किंवा थकबाकीची देयके ग्राहकांना पाहण्यास उपलब्ध आहेत. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे वीजबील भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन वीजबील भरल्यास संगणकीकृत पावतीही ग्राहकाला मिळते. मोबाइल अ‍ॅप्लिकेशन मराठी आणि इंग्रजी भाषेत असून ही सेवा 24 तास उपलब्ध आहे. त्यामुळे वीज बिल केव्हाही आणि कोठूनही भरता येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT