अहमदनगर

कर्जत-जामखेडसाठी 5 कोटींचा निधी : आमदार प्रा. राम शिंदे

अमृता चौगुले

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लागण्याासाठी ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेतून सुमारे पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून कर्जत-जामखेडकरांना ऐन दिवाळीत सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. सरकारने आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत मतदारसंघातील 51 कामांना मंजुरी देत, 5 कोटींचा निधी मंजूर केला आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार आहेत. कर्जत व जामखेड तालुक्यांसाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल आमदार शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले आहेत.

जामखेड तालुक्यातील मंजूर कामे व निधी – घोडेगाव येथे सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. हळगाव येथील तुकाईवस्ती येथे बाळू मामा मंदिर सभामंडप बांधणे 7 लाख रूपये. मतेवाडी येथे मतेगल्ली ते कल्याण रांगडे घरे सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करणे 8 लाख रूपये. कवडगाव येथे स्मशानभूमी बांधणे 10 लाख रूपये. महारूळी येथे सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. बाळगव्हाण येथील तुळजाभवानी मंदिर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. दिघोळ येथे संत नरहरी सोनार महाराज मंदिर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. पाडळी येथील जिल्हा परिषद शाळा संरक्षक भिंत उभारणे 10 लाख रूपये. फक्राबाद येथे कब्रस्थान वॉल कंपाऊड बांधणे व सुशोभीकरण करणे 10 लाख रूपये. पाटोदा बसस्थानक परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये.

बुर्‍हाणपूर येथील मारूती मंदिर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. मुंगेवाडी येथे जिल्हा परिषद शाळा इमारत बांधणे 10 लाख रूपये.
कर्जत तालुक्यातील मंजूर कामे व निधी – कोपर्डी येथे हरणवाडी मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. तिखी येथे मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. चलाखेवाडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.
खुरंगेवाडी येथे हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. राक्षसवाडी खुर्द येथे अहिल्यादेवी यांच्या स्मारकास सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.

पिंपळवाडी येथील माळवदे वस्ती जिल्हा परिषद शाळेत पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये. देऊळवाडी येथे शिवाई मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये. दिघी येथे महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. लोणी मसदपूर येथे फिरंगाईदेवी मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये.

मानेवाडी येथे ज्योतिबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. शिंतोडा येथे भैरवनाथ मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. हंडाळवाडी येथे गावठाण रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख रूपये.

अंबी जळगाव येथे बिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. डोंबाळवाडी येथे तुळजाभवानी मंदिर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये. औटेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेजवळील रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख रूपये. नागापूर येथे बुवासाहेब महाराज मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये.

बाभुळगाव खालसा येथे मारूती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये. नेटकेवाडी येथे तुळजाभवानी मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये. बाभुळगाव दुमाला येथे मरिमाता मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. कोळवडी येथे नवीन अंगणवाडी बांधकाम करणे 10 लाख रूपये.

थेरवडी येथे मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. वालवड येथे महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. गोयकरवाडी येथे ज्योतिर्लिंग मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये.

गुरवपिंप्री येथे महादेव मंदिर आवारात भजनी साहित्य ठेवण्यासाठी खोली बांधणे 10 लाख रूपये.

कोरेगाव येथे सटवाई मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये. बहिरोबावाडी येथे यल्लमादेवी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे 5 लाख रूपये.

थेटेवाडी येथे मारूती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये.

खांडवी येथे तुकाई मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.

नागलवाडी येथे नागेश्वर मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.

सितपूर स्मशानभूमी परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये.

घुमरी येथे काळूबाई मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.

कोळवडी येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.

मिरजगाव येथे भारत विद्यालय परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख रूपये.

नवसरवाडी येथे यल्लामादेवी मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.

बारडगाव दगडी येथे सांस्कृतिक सभागृह बांधणे 10 लाख रूपये.

पाटेवाडी येथे मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.

रवळगाव येथे खंडोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.

सुपे येथे मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये.

आनंदवाडी येथे गावठाणमध्ये रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख रूपये.

SCROLL FOR NEXT