अहमदनगर

Nagar : बारा गावांसाठी पावणेदोन कोटी ; आमदार तनपुरे यांच्या पाठपुराव्याला यश

अमृता चौगुले

राहुरी :  पुढारी वृत्तसेवा : राहुरी मतदार संघातील 12 गावांतील विकास कामांसाठी 1 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत मिळाला आहे. या निधीमुळे या गावांमधये विकास कामांची गंगा वाहणार असल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

राहुरी तालुकयातील तांदूळवाडी येथील खडके वस्ती सौरपथदिवे बसविणयासाठी 4 लाख, बाभूळगाव पाटोळे धनगर वस्ती सौर पथदिवे बसविणे 10 लाख, कणगर गोसावी वस्ती 4 लाख, आरडगाव विखुरले वस्ती सौरपथदिवे बसविणे 10 लाख, उंबरे वडारवस्ती पाईपलानईन बसविणे 6 लाख, राहुरी खुर्द गोटूंबे आखाडा येथे रस्ता काँक्रिटकरण 10 लाख, वांबोरी पाची महादेव वस्ती रस्ता काँक्रिटकरण व अंडरग्राउंड गटारीसाठी 10 लाख, वांबोरी धनवटे वस्ती रस्ता काँक्रिटकरण व अंडरग्राउंड गटार 10 लाख, शेरी चिखलठाण काळनर वस्ती रस्ता काँक्रिटकरण 10 लाख, ब्राम्हणी नगरे वस्ती रस्ता खडीकरण 10 लाख, ब्राम्हणी खळवाडी हायस्कूल रस्ता काँक्रिटकरण 10 लाख, ब्राम्हणी घुगरेवस्ती रस्ता खडीकरण 10 लाख, ब्राम्हणी कैकाडीवस्ती रस्ता काँक्रिटकरण 4 लाख, ब्राम्हणी पाटोळे बनसोडे वस्ती रस्ता खडीकरण लाख, बारागाव नांदूर पुनर्वसण गावठाण धनगरवस्ती रस्ता काँक्रिटकरण 6 लाख, बारागाव नांदूर गावठाण वंजार वस्ती रस्ता काँक्रिटकरण 4 लाख , बारागाव नांदूर मंडलिक आखाडा धनगर वस्ती रस्ता काँक्रिटकरण 6 लाख, बारागाव नांदूर ब्रम्हटेक धनगर वस्ती रस्ता काँक्रिटकरण 6 लाख, बाभूळगाव मानेवस्ती रस्ता काँक्रिटकरण 10 लाख, कणगर आडभाई वस्ती रस्ता खडीकरण 10 लाख, कणगर धामोरे वस्ती रस्ता खडीकरण 6 लाख असा निधी वितरीत करण्यात आला आहे.

निधी मिळावा यासाठी आ. तनपुरे यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने त्यास यश मिळाले. या निधीमुळे 12 गावांमधये विकासकामांची गंगा वाहणार असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत शासन दरबारी प्रस्ताव मांडताच जिल्हास्तरीय समितीने शिफारस केल्याने निधी वितरीत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT