अहमदनगर

पाथर्डी तालुक्यातील केदारवस्ती शाळेच्या परसबागेला तिसरे बक्षीस

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील केदारवस्तीच्या प्राथमिक शाळेतील परसबागेला तालुकास्तरीय प्रथम, तर जिल्हास्तरीय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत जिल्हास्तरावर उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत सैदापूर हत्राळच्या केदारवस्ती प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी तयार केलेल्या परसबागेचा तालुक्यात प्रथम क्रमांक व जिल्ह्यात तृतीय क्रमांक आला.

परसबागेला दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आलेे. परसबागेत पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती, फळझाडांंची लागवड व जोपासना यांचे मार्गदर्शन आदिनाथ भडके हे शिक्षक करीत आहेत. मुख्याध्यापक अभिमान पाखरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर केदार, सारिका केदार, रेवन्नाथ केदार व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. गटशिक्षणाधिकारी अनिल भवार, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, राजेंद्र बागडे, अभय वाव्हळ, केंद्रप्रमुख मेहताब लद्दाफ यांनी शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

SCROLL FOR NEXT