क्राइम  Pudhari Police
अहमदनगर

बसमधून 25 हजार लंपास करणार्‍या ; महिलांना राहुरीत प्रवाशांची मारहाण

पुढारी वृत्तसेवा

एसटी बसमधून प्रवास करताना एका महिलेच्या पर्समधील 25 हजार रुपयांची रोकड चार चोरट्या महिलांनी लंपास केली, मात्र त्याच बसमधून प्रवास करणार्‍या पोलिस हवालदार मंजूश्री गुंजाळ यांनी चोरट्या महिलांना पकडून त्यांची यथेच्छ धुलाई केली. विशेष असे की, चोरट्या महिलांनी चोरलेली रोकड परत केली. महात्मा फुले विद्यापिठासमोर ही सिनेस्टाईल घटना बुधवारी भर दुपारी घडली.

तालुक्यातील सोनगाव येथील वैशाली राजाराम बिडवे या बुधवारी दुपारी राहुरी बस स्थानकावर नगरला जाणार्‍या बसमधून प्रवास करीत होत्या. राहुरी ते विद्यापीठ दरम्यान बसमधील गर्दीचा फायदा घेत काही चोरट्या महिलांनी वैशाली बिडवे यांच्या पर्समधील 25 हजार रुपयांची रोकड चोरली.

चोरट्या महिलांनी नगरचे तिकीट घेतले होते, मात्र त्या विद्यापीठ येताच बसमधून खाली उतरल्या. बस पुढे काही अंतरावर पोहचल्यानंतर पर्समधील रोकड चोरी झाल्याचे वैशाली बिडवे यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडा ओरड केली. यावेळी बसमधून प्रवास करणार्‍या पोलिस हवालदार मंजूश्री गुंजाळ यांनी हा प्रकार एसटीचे चालक व वाहकाला सांगत, एसटी राहुरीकडे वळविण्यास सांगितले. बस पुन्हा राहुरीकडे निघाली असता चोरट्या महिला विद्यापीठ बस स्थानकासमोर उभ्या दिसल्या. पोलिस हवालदार गुंजाळ यांनी चार महिलांना पकडून त्यांची यथेच्छ धुलाई केली. चोरट्या महिलांनी चोरलेली 25 हजाराची रोकड परत केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी हजर झाले. चार चोरट्या महिलांना ताब्यात घेवून राहुरी पोलिस ठाण्यात नेले.

हवालदार महिलेचे कौतुक!

महिला पोलिस हवालदार मंजूश्री गुंजाळ यांनी प्रसंगाधान राखून चार चोरट्या महिलांची येथेच्छ धुलाई केली. एवढेच नव्हे तर त्या महिलांनी चोरलेली 25 हजारांची रोकड पुन्हा प्रवाशी महिलेला मिळवून दिली. गुंजाळ यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे चोरट्या महिला पोलिसांच्या हाती लागल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT