अहमदनगर

नगर : मेडिकल चालविण्यासाठी 2 कोटींची फसवणूक

अमृता चौगुले

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  येथील नामांकित हॉस्पिटलच्या सूत्रधारांनी हॉस्पिटलमधील मेडिकल चालविण्यासाठी केलेल्या व्यवहारात 1 कोटी 77 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भात निलेश रवींद्र चौधरी (रा. शिंगवे ता. कोपरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी डॉ. सुमन सुकुमार बंडोपाध्याय (रा. दामिनी सोसायटी, पोतदार वर्ड कॉलेज मागे जुहूतारा रोड मुंबई, 49) व संजय नंदू कोळी (रा. शंकर अपार्टमेंट बारामती, जि. पुणे)े यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौधरी यांनी फिर्यादीत म्हटले की, वरील आरोपींनी संगनमत करून कोपरगाव येथील एका नामांकीत हॉस्पिटलचे मेडिकल चालविण्यासाठी देण्याचे कारणावरून त्याद्वारे येणार्‍या नफ्याचे आमिष दाखवले. सदर मेडिकल चालविण्यासाठी डिपॉझिटचे कारण पुढे कले व वेळोवेळी नीलेश रवींद्र चौधरी व साक्षीदार यांचेकडून बँकेच्या माध्यमातून 1 कोटी 77 लाख 65 हजार 862 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

SCROLL FOR NEXT