श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूरातील रस्त्यांसाठी 2 कोटी 60 लाखांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली. सर्वसाधारण वार्षिक योजना 2022-23 अंतर्गत आपण सुचविलेली 2 कोटी 60 लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी स्वतंत्र आदेश काढून मंजुरी दिली आहे.
यामध्ये अशोकनगर ते मातापूर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण (50 लक्ष), खैरी निमगाव ते नाऊर रस्ता डांबरीकरण ( 50 लक्ष), बेलापूर ते शिरसगाव रस्ता (35 लक्ष), मालुंजे बु. ते मातापूर रस्ता (40 लक्ष), विद्यानिकेतन स्कुल ते सुभाषवाडी रस्ता (40 लक्ष), वडाळा महादेव ते भोकर (20 लक्ष), करजगाव फाटा ते ब्राम्हणगाव भांड काळे भांड वस्ती रस्ता (25 लक्ष) असा एकूण श्रीरामपूर मतदारसंघासाठी 2 कोटी 60 लक्ष निधी मंजुर करण्यात आला आहे.
मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी सतत प्रयत्नशील सदरच्या कामांची निविदा प्रक्रीया सुरु असून लवकरच या कामांना सुरुवात होईल, अशी माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली. श्रीरामपुरातील रस्त्यांची कामे होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे.