राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणाच्या लाभक्षेत्रासह पाणलोट क्षेत्रावर पावसाचा वर्षाव वाढल्याने विसर्गात वाढ करण्यात आली आहे. काल (दि. 13) रोजी दुपारी 4 वाजता 10 हजार क्यूसेकने जायकवाडीच्या दिशेने मुळाचे पाणी वाहत आहे. दरम्यान, धरणसाठा 26 हजार दलघफू पूर्ण क्षमतेने आहे. आवकेचे पाणी व मुळा धरण स्थळी पडणार्या धो-धो पावसाच्या वर्षावामुळे धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडले आहेत. मुळा धरणाच्या लाभक्षेत्रावरील मुळानगर, काळू प्रकल्प, भाळवणी, टाकळी ढोकेश्वर, शेरी चिखलठाण, म्हैसगाव आदी पट्ट्यासह राहुरी हद्दीत पावसाचा धो-धो वर्षाव सुरू आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्र कोतूळ सरिता मापन केंद्रातून केवळ 1 हजार 200 क्यूसेकने आवक होत आहे. परंतु धरण लाभक्षेत्र हद्दीत पावसाचा वर्षाव वाढत आहे. धरण 26 हजार दलघफू पूर्ण क्षमतेने भरले आहे. उर्वरित आवकेच पाणी विसर्गाद्वारे सोडले जात आहे. यंदाच्या मान्सून हंगामात 14 ऑगस्टपासून सलग धरणाचे दरवाजे उघडले आहे. शहरात पावसाने आठवडे बाजाराची दैना उडविली.
धो-धो पाऊस सुरुच..!
पावसाची परिस्थिती पाहता यंदाही विसर्गाचा उच्चांक होईल, अशी परिस्थिती होती. मान्सून हंगामात परतीच्या पावसानेही धुमाकूळ सुरूच ठेवला. परिणामी दिवाळी सण तोंडावर असताना मुळा वाहती आहे. धो- धो वर्षाव सुरूच आहे. मुळातून जायकवाडीस 18 हजार दलघफू नव्याने पाणी लाभले.