पुढारी ऑनलाईन डेस्क : समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे, अशी माहिती पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
जयंत पाटील यांनी सांगितले की, स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना अनुशक्ती नगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या (अजित पवार) सना मलिक यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे.
पमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. यामध्ये नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांच्याही नावाचा समावेश आहे. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढविणार आहेत.
नवाब मलिक यांनी निवडणूक लढवू नये, अशी समजूत अजित पवारांनी घातली होती. मात्र आपण निवडणूक लढवणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले आहे.शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून ते समाजवादी पार्टीचे नेते अबु आझमी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. २९ ऑक्टोबर रोजी ते अर्ज दाखल करणार आहेत. आता नवाब मलिकांच्या निर्णयामुळे शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेश शरदचंद्र पवार पक्षाने अणुशक्ती नगर जागेवरून उमेदवारी जाहीर केल्यानंतर माध्यमांशी बोलताना , फहाद अहमद म्हणाले की, शरद पवार हे देखील एक समाजवादी नेते आहेत. मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांना उमेदवार म्हणून माझे नाव जाहीर करायचे असल्याचे सांगितले होते.