पुणे : पुढारी वृत्तसेवा : एप्रिल ते जून या तीन महिन्यात महाराष्ट्रासह बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, गुजरात, पंजाब आणि हरियाणाचे कमाल तापमान सरासरी पेक्षा 4 ते 5 अंशांनी जास्त राहील.तसेच जून ते ऑगस्ट दरम्यान ला-नीना सकारत्मक असल्याने मान्सूनला अडथळा नाही.अशी माहिती दिल्ली येथील भारतीय हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने शनिवारी रोजी देशात एप्रिल ते जून या कालावधीत हवामानाची परिस्थिती कशी असेल याचा अंदाज वर्तवला. सध्या देशाच्या अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. त्या नुसार, प्रायद्वीपीय प्रदेश आणि पश्चिम-मध्य भारताचा काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात एप्रिल ते जून या कालावधीत कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
या राज्यात तापमान वाढेल..
एप्रिल ते जून दरम्यान पूर्व आणि वायव्य भारतातील बहुतांश भागात सामान्य उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचे दिवस लक्षणीयरीत्या जास्त राहण्याचा अंदाज डॉ. महापात्रा यांनी व्यक्त केला.
पाऊस सामान्य राहील..
हवामान खात्याने म्हटले आहे की,देशात एप्रिल मध्ये ३९.२मी.मी इतका पाऊस पडतो. एप्रिलमध्ये दक्षिण भारत वगळता उर्वरित देशात सामान्य पाऊस पडेल.दक्षिण भारतात पाऊस सामान्य पेक्षा जास्त पाऊस राहील.
ला- नीना मुळे चांगला मान्सून..
भारतीय समुद्री स्थिरांक अर्थात इंडियन ओशियन डायपोल (आयओडी) नकरात्मक असल्याने त्याचा मान्सूनवर विपरीत परिणाम होईल का? या प्रश्नावर डॉ.महापात्रा म्हणाले,आयओडी सध्या स्थिर आहे(न्यूट्रल) तो पुढे नकारात्मक होत जाण्याची शक्यता आहे.मात्र पावसासाठी ला नीना ही स्थिती चांगली असे.जून ते ऑगस्ट पर्यन्त ला नीना सकारत्मक आहे.मात्र मान्सूनचा अंदाज इतक्या लवकर देणे कठीण आहे.15एप्रिल रोजी आम्ही तो जाहीर करणार आहोत.