बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी पाच वर्षांनंतर मंगळवारी (दि. 30) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात 2013 साली वादाचे मुद्दे निश्चित झाल्यानंतर आणि कोर्ट कमिशनर नियुक्त केल्यानंतर कर्नाटकने फेरविचार याचिका दाखल केली होती.
त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकने प्रत्येकी दोन अंतरिम अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये सीमाभागात पुरावेजन्य स्थितीत हस्तक्षेप करण्यात येऊ नये आणि केरळमधील कासरगोड परिसरात कन्नड भाषिकांचा विषय मांडण्यात आला आहे. तर कर्नाटकने जत तालुक्यातील कन्नड भाषिकांचा विषय मांडला आहे. या अंतरिम अर्जांवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.