Latest

Third Mumbai : राज्याला लवकरच मिळणार तिसरी मुंबई; अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह साकारणार हायटेक शहर

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वप्नांचं शहर म्हणून राज्याची राजधानी मुंबईचा उल्लेख केला जातो. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मात्र जागेची उपलब्धता ही फार मोठी समस्या बनली आहे. यावर मात करण्यासाठी मुंबई, नवी मुंबई यानंतर आता राज्य सरकार तिसरी मुंबई साकारणार आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात हे शहर साकारले जाणार आहे. (Third Mumbai)

तिसऱ्या मुंबईची कल्पना सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ नोव्हेंबर २०२२ला मांडली होती. आता आपल्याकडे दोन मुंबई आहेत, पण पायाभूत सुविधांची सर्व कामे मार्गी लागल्यानंतर तिसरी मुंबई साकारली जाईल, रस्ते आणि मेट्रोच्या बाजूने नवे शहर साकारले जाईल. बंदराशी कनेक्टिव्हिटी असलेले आणि एक परिसंस्था म्हणून आकारास येणार हे शहर असेल असे ते म्हणाले होते. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तात राज्य सरकारने तिसऱ्या मुंबईचे बृहद प्रारूप मंजुर केल्याचे म्हटले आहे.

तिसऱ्या मुंबईत काय असेल? Third Mumba

विकसित शहराला आवश्यक त्या सर्व सुविधा तिसऱ्या शहरात असतील. लक्झरियस, तसेच परवडणारी घरे, व्यापारी संकुलं, डेटा सेंटर, बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी हब, बँका, विस्त संस्थांसाठी आवश्यक त्या सुविधा, नॉलेज पार्क अशा सगळ्या सुविधा येथे उभारण्यात येणार आहेत.

काय अपेक्षित आहे? Third Mumba

1. खारघर येथे बीकेसीसारखी सुविधा
२. नवी पनवेल ते कर्जतसाठी रेल्वे कॉरिडॉर
३. एमएमआरमधील दुरच्या ठिकाणांचा विकास
४. न्यू टाऊन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (NTDA)
५. दोनशे गावांचा समावेश

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT