पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र दिनानिमित्त नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधन करताना ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिले, त्यांना मी मानवंदना अर्पित करत महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. सरकारने राज्याच्या प्रगतीसाठी अथक प्रयत्न केले, वेगवेगळ्या मानकांवर महाराष्ट्राने चांगली प्रगती केली आहे, जनतेचं आरोग्य ही सरकारचं प्राथिमकता आहे.
आज राज्यभरात मोठ्या उत्साहात सर्वजण ६३ वा महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत. महाराष्ट्र दिनानिमित्त नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी फडणवीस पुढे म्हणाले, जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा त्यांनी संबोधले होते की, देशात १४ वे रत्न जन्माला झाले आहे. त्यानंतर महाराष्ट्राने जी प्रगती केली आहे ती सर्वांचे डोळे दिपावणारी राहिली आहे. आज आपल्या महाराष्ट्राने वेगवेगळ्या मानकांवर चांगली प्रगती केली आहे. म्हणूनच महाराष्ट्राकडे देशभरात पुरोगामी म्हणून पाहिले जाते.
राज्यातील शेती शाश्वत झाली पाहिजे
पुढे बोलत असताना फडणवीस म्हणाले, नऊ महिन्यापूर्वी राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक नवं सरकार स्थापन झालं आहे. या नऊ महिन्यात आपण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या सरकारचा पहिला अर्थसंकल्प ज्यामध्ये आम्ही विविध घोषणा घोषित केल्या त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी त्यांच्यावर नैसर्गिक संकटांमुळे जी परिस्थिती ओढावते त्यासाठी विविध योजना आणल्या. शिंदे सरकार आल्यापासून राज्यातील शेतीसाठी आपण अनेक निर्णय घेतले गेले. शेतीच्या प्रगतीसाठी अथक प्रयत्न केले. राज्यातील शेती शाश्वत झाली पाहिजे. पण अवकाळी पाऊस हे सर्वात मोठं नैसर्गिक आव्हान आहे.
त्याचबरोबर ३०० हून अधिक 'आपला दवाखाना'चं उद्धाटन केलं आहे. जनतेचं आरोग्य ही सरकारची प्राथिमकता आहे. याशिवाय महिलांसाठी विविध योजनांची घोषणा केली. महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक येत आहे ती देशात येणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी 30 टक्के आहे. मला विश्वास आहे की तळागाळातील सर्वांना एकत्र घेऊन हे सरकार आपलं राज्य प्रगतीवर नेण्याचा प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.