Maharashtra Assembly Winter Session  
Latest

Maharashtra Assembly Winter Session : डार्कनेटद्वारे ऑनलाईन लूट, चुकीच्या स्किममध्ये गुंतवणूक करू नका – फडणवीस

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क – नागपूर हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी अवकाळी नुकसानी भरपाईचा मुद्दा उचलून धरला. यावेळी विरोधक अवकाळी नुकसानीच्या भरपाईसाठी विरोधक आक्रमक झाले. शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, प्रश्नोत्तरांचा तास रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली. (Maharashtra Assembly Winter Session) विरोधकांचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन गेमिंगच्या मुद्द्यावर चर्चा केली. डार्कनेटद्वारे ऑनलाईन लूट सुरु असल्याचे ते म्हणाले. (Maharashtra Assembly Winter Session)

दरम्यान, आज हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करावी, अशी मागणी वडेट्टिवार यांनी केली.

ऑनलाईन गेमिंगद्वारे होणारी फसवणुकीबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती करायला हवी, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले- जनतेने कोणत्याही चुकीच्या स्किममध्ये गुंतवणूक करू नका. निवडणुकीची चर्चा सुरु आहे. विधानसभेकेड सर्वांचे लक्ष लागून असते. या माध्यमातून जनतेला जागृत करू इच्छितो की, फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे. अमूक इतकी रक्कम गुंतवणूक करा, डबल पैसे दतो वगैरे आमिष दाखवून फसवणूक करण्यांपासून जनतेनं सावध राहिलं पाहिजे. गुन्हा घडल्यानंतर ही प्रकरणे उघडकीस येतात. लोकांच्या घामाचा पैसा लुटला जातोय. जोपर्यंत अधिकृत स्किम समोर येत नाहीत, तोपर्यंत लोकांनी कोणतीही आर्थिक गुंतवणूक करू नये. लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे.

नाना पटोले म्हणाले, चायनीज ॲपसारखे अनेक ॲप वेगवेगळ्या ॲप बाजारात आलेले आहेत. सरकारचे यावर नियंत्रण हवे. अनेक सिस्टीममधून पैसे सुटले जात आहेत. ही व्यवस्था बदलली गेली पाहिजे. आर्थिक फसवणुकीमुळे अनेकांनी आपले जीवन संपवले आहे. ऑनलाईन गेमिंगद्वारे मोठी लूट सुरु आहे. राज्यातील सायबर लूट सरकार कशी रोखणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT