पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशमधील भिंड येथे भारतीय हवाई दलाचे अपाची हेलिकॉप्टरने आज सकाळी इमर्जन्सी लँडिंग केले.
हवाई दलाच्या अपाची हेलिकॉप्टरने भिंड जिल्ह्यातील जखनौली गावाजवळील सिंध नदीच्या खोऱ्यात इमर्जन्सी लँडिंग केले. ( Helicopter Emergency landing)
इमर्जन्सी लँडिंगची माहिती मिळताच उमरी पोलिस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच घटनास्थळी मदतीसाठी दुसरे हेलिकॉप्टर पाठविण्यात आले असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.