थायलंडमध्ये महाकाय गणेश मूर्तीसह अनेक ठिकाणी गणेश मंदिरे आहेत. श्रीगणेश उपासनेतून उज्ज्वल भविष्य, यश, शिक्षण, कला, व्यापार यामध्ये वृद्धी होते, अशी भक्‍तांची धारणा आहे. छाओंगसाओ भागात बैठी मूर्ती 49 मीटर (सुमारे 150 फूट) उंच व 19 मीटर (सुमारे 60 फूट) रुंद आहे.  
Latest

Lord Ganesha : भारताबाहेर ‘या’ देशांमध्‍येही हाेते श्रीपूजन

दिनेश चोरगे

भारताबाहेर अनेक पौर्वात्य देशांत श्रीगणरायाची मंदिरे आहेत. तिथे श्रीगणेशाची भक्‍तिभावाने पूजा-अर्चा होते. भारतात आलेल्या चिनी प्रवाशांनी आपल्यासमवेत भारतीय संस्कृतीची प्रतीके नेली. ( Lord Ganesha ) त्यातून श्रीगणेशमूर्ती आग्‍नेय आशियातील अनेक देशांत पोहोचल्या. श्रीगणेशपूजा त्या-त्या देशांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात समाविष्ट झाली.

आग्‍नेयपूर्व आशियातील अनेक देशांत गेल्या हजार-बाराशे वर्षांत गणेश मंदिरे उभी राहिली आणि तत्कालीन राजवटींनी त्यांना राजाश्रय दिला. प्रतिष्ठा मिळवून दिली. जपानमध्ये कांगीतेन, शोतेन, विनायक तेन, गनाबाची अशा नावांनी श्रीगणेश भक्‍तहृदयात वास करतो. महाराष्ट्रात गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. ( Lord Ganesha ) जपानमध्ये तसाच पदार्थ गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. हत्तीचे मस्तक – गजमुख असलेल्या या गणेशमूर्ती जपानमध्ये अनेक शतकांपासून भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. ही देवता संपत्ती आणि संसारसुख देणारी असल्याचे मानले जाते. त्यामुळे या गणेश देवतेचा भक्‍तगण मोठ्या संख्येने आहे. चीनमध्ये अंकुर यांग या भागात असलेल्या गुहांमध्ये भिंतीवर गणरायाची चित्रे आहेत. मस्तकावर पगडी आहे. अन्य काही ठिकाणीही गणपतीची गुहा चित्रे आहेत. ही चित्रे सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीची असल्याचे संशोधकांचे मत आहे. चीनच्या वस्तुसंग्रहालयात गणेशाच्या मूर्ती आहेत.

थायलंडच्‍या छाओंगसाओ भागातील या मूर्तीची उंची 30 मीटर (सुमारे 98 फूट) एवढी आहे.

कम्बोडियात अंकुरबटाला स्थापत्य शिल्प अंगोरवार नावाने प्रसिद्ध आहे. येथे गणपती मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. कम्बोडियात गणपतीची कास्य मूर्ती मिळाली आहे. थायलंडमध्येही अनेक ठिकाणी चित्तवेधक आणि महाकाय गणेशमूर्ती आहेत. बालीमध्ये जमबरन येथे सिंहासनारुढ गणेशमूर्ती आहे. या मूर्तीच्या हातात मशाल असून, सिंहासनाला चारी बाजूला अग्‍निशिखा आहेत. अनेक ठिकाणी गणपतीच्या उभ्या मूर्ती आहेत. भारतात गणेशमूर्तीत जानव्याऐवजी नाग दाखवला जातो. त्याप्रमाणे इथल्या मूर्तीवरही नाग दर्शवलेला आहे.

मलायामध्ये धातू आणि दगडाच्या गणेशमूर्ती आढळतात. मूर्तीची सोंड सरळ खाली व शेवटी वर वळलेली असते. जावामध्ये चंडी बनोन येथील शिवमंदिरात गणेशमूर्ती आहे. नदी किनारी घाटावर अनेक गणेशमूर्ती स्थापन केलेल्या दिसतात.  म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) अनेक गणेश मंदिरे आहेत आणि


थायलंडच्‍या छाओंगसाओ भागातील 16 मीटर (सुमारे 50 फूट) उंच आणि 22 मीटर (सुमारे 70 फूट) रुंद आहे.

तेथील लोकांचे गणेश हे आराध्य दैवत आहे. नेपाळमध्ये सम्राट अशोकाच्या मुलाने अनेक मंदिरे स्थापन केली. त्यात गणपतीची प्रतिष्ठापना केली. भारतातील गणपती पंचायतनात गणेशासह पाच स्वतंत्र मूर्ती असतात. नेपाळमध्ये मुख्य गणेशमूर्तीभोवती गणेशाच्याच चार मूर्ती असतात. त्यात एक मूर्ती सिद्धिविनायकाची असते. तिबेट येथेही गणेश मंदिरे आहेत.

परदेशातील गणेशाोत्‍सव

आपल्या भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सुखकर्ता, दुःखहर्ता श्रीगणरायाचे स्वागत आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो. आता गणेशोत्सव केवळ भारतातच नव्हे; तर परदेशातही महत्त्वाचा उत्सव झाला आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जपान, मॉरिशस यासह आग्‍नेय आशियातील देशांत गणेशोत्सव भक्‍तिभावाने जल्‍लोषात साजरा होतो.

अमेरिकेत न्यूयॉर्क, फ्लोरिडा, मियामी, सॅनफ्रान्सिस्को यासह अनेक भागात हिंदू संघटना, साई संस्थान यांच्या वतीने दहा दिवस गणेशोत्सव पार पडतो. हिंदू समुदायाबरोबर ख्रिश्‍चन समाजातील लोकही त्यात सहभागी होतात. बलदेव उपाध्याय यांचा 'पुराण विमर्श' नावाचा ग्रंथ आहे. त्यात त्यांनी अमेरिकेत गणेशमूर्ती सापडल्याचा दावा केला आहे.

इंग्लंडमध्ये 2015 मध्ये विश्‍व हिंदू मंदिरात श्रीगणरायाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून तिथे गणेशोत्सव साजरा होतो. मंदिरे, गुरुद्वारातून विविध हिंदू संघटना गणेशोत्सवाचे आयोजन करतात. टाळ-मृदुंगाच्या गजरात, ढोल-ताशांच्या दणदणाटात गणरायाचे स्वागत होते. मिरवणुका निघतात, थेम्स नदीत श्रीमूर्तींचे विसर्जन होते.

फ्रान्समध्ये मणिक्‍क विनायक मंदिरात गणेशोत्सव उत्साहाने साजरा होतो. हिंदूंबरोबरच युरोपीय आणि श्रीलंकन नागरिकही त्यात आनंदाने सहभागी होतात. मिरवणुकांसाठी रस्ते पाण्याने स्वच्छ धुतले जातात. दहा दिवस जनसमुदायाच्या उपस्थितीत आरती, मंत्रपुष्पांजली होते. बाप्पांना भक्‍तिभावाने निरोप दिला जातो. जपानमध्ये श्रीगणरायाला कांगीतेन असे म्हटले जाते. आठव्या शतकात भारतातून चीनमध्ये आणि तिथून जपानमध्ये श्रीगणेशमूर्तीचे आगमन झाले आणि चिनी/जपानी संस्कृतीत गणरायाला स्थान मिळाले. इथे गणेशचतुर्थी – गणेशोत्सव भक्‍तिभावाने ठिकठिकाणी साजरा केला जातो.

मॉरिशसमध्ये हिंदूंची संख्या मोठी आहे. भारतातून दोन-तीन शतकापूर्वी इथे आलेल्या हिंदूंनी आपली संस्कृती जपली आहे. इतर सणांबरोबरच गणेशोत्सव सर्व देशभर थाटाने पार पडतो. त्यात सर्वधर्मीय सहभागी होतात. गणेश चतुर्थीला मॉरिशस सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT