London Misal Movie 
Latest

London Misal movie : ”लंडन मिसळ” चित्रपटाचा ‘फुल टू धमाल’ ट्रेलर प्रदर्शित

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेते भरत जाधव हटके भूमिकेत दिसणार आहे. भरत जाधवने पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून 'लंडन मिसळ' ( London Misal movie ) हा चित्रपट प्रेरित आहे, हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य. ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत हा चित्रपट आहे. ( London Misal movie )

लंडन मिसळ चित्रपटातल्या चटपटीत सीन्सनी आणि कलाकारांच्या धमाकेदार परफॉर्मन्सनी भरलेला ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. रितिका आणि ऋतुजाचे चित्रपटातील लुक्स कथेतील उत्सुकता वाढवताहेत. आपल्या अभिनयातून भरत जाधव पुन्हा एकदा विनोदाची चौफेर फलंदाजी करताना दिसतायेत.

गौरव मोरेचेही हास्याचे षट्कार आपल्या सीन्समधून पाहायला मिळताहेत. ट्रेलर रिलीजवेळी भाजपचे प्रदेशिय चिटणीस श्रीकांत भारतीय हे चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. 'लंडन मिसळ' या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत तर सह-निर्माते सानिस खाकुरेल आहेत. जालिंदर कुंभार यांची कथा असून सह-दिग्दर्शन वैशाली पाटील यांनी केले आहे. पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत.

वैशाली सामंत, रोहित राऊत, वैष्णवी श्रीराम यांचे संगीत आहे. 'बाईपण भारी देवा' फेम संगीतकारांच्या जोडीने 'लंडन मिसळ' चित्रपटाचे बॅकग्राऊंड म्युझिक दिलं आहे. चित्रपटाची गाणी मंदार चोळकर, मंगेश कांगणे आणि समीर सामंत यांनी लिहिली आहेत. वैशाली सामंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कऱ्हाडे, वैष्णवी श्रीराम यांनी गाण्यांना स्वरसाज चढवला आहे.

चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

अशी आहे लंडन मिसळची कथा?

आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची ही कथा आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो.

'लंडन मिसळ' या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत तर सह-निर्माते सानिस खाकुरेल आहेत. दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT