जयंत पाटील 
Latest

नगर दक्षिणमध्ये आम्ही तुतारी वाजवणार : जयंत पाटील

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नगर लोकसभा मतदार संघामध्ये नगर दक्षिण मध्ये आम्ही तुतारी वाजवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. लंकेंनी तुतारी स्वीकारली का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जयंत पाटील म्हणाले, त्यांनी तुतारी हातात धरलेली आम्ही पाहिली. योग्यवेळी आमचा निर्णय कळवू. ते पुढे म्हणाले, एवढी मोठी मेजोरेटी आणखी नवनव्या पक्षांची गरज का भासते, पूर्ण आत्मविश्वास का भासते?

पुण्यातून जयंत पाटील प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरु आहे. एखाद्या मित्रपक्षाशी बोलत असताना, जाहिरपणे वक्तव्य करणे योग्य होणार नाही. आमची आघाडीची बैठक, जागावाटप झाले की, सर्व पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील.

निलेश लंके विषयी ते म्हणाले, ते फार लोकप्रिय आहेत. ते जर निवडणुकीला उभे राहिले तर ते निश्चित निवडून येतील. लंके आमचे उमेदवार व्हावेत, त्याबबातील आवश्यक सोपस्कार आम्ही पूर्ण करू.

जागावाटपाच्या बैठकीनंतर सर्व पक्ष उमेदवार जाहीर करतील, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT