Lok Sabha Election 2024

Lok Sabha Elections | हवाई प्रचार केला, तरीही खासदारकीने अंगठा दाखवला

दिनेश चोरगे

मध्य प्रदेशातील होशंगाबाद लोकसभा मतदार संघात 1988 मधील निवडणुकीत सर्वस्वी वेगळी घटना घडली. वेळ सकाळी दहाची. अचानक आकाशात हेलिकॉप्टर भिरभिरले. लोकांची उत्सुकता ताणली गेली. त्या हेलिकॉप्टरमधून काँग्रेसचे अर्जुन सिंह यांच्या नावाची प्रचारपत्रके खाली सोडण्यात आली. ती घेण्यासाठी लोकांची गर्दी उसळली. त्यात अर्जुन सिंह यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे लोकांना समजले. (Lok Sabha Elections)

भाजपचे सरताज सिंह लागोपाठ तीनदा होशंगाबाद मतदार संघातून विजयी झाले होते. त्यांना पराभूत करण्याचा चंग काँग्रेसने बांधला होता. यासाठी अर्जुन सिंह यांच्यासारखा तगडा उमेदवार मैदानात उतरविण्यात आला. त्यांच्या हवाई प्रचाराची बरेच दिवस मध्य प्रदेशात चवीने चर्चा झाली. मात्र, एवढे करूनही अर्जुन सिंह यांच्या पदरी घोर निराशा पडली.

SCROLL FOR NEXT