डॉ. श्रीकांत शिंदे यांची रॅली  
Latest

Lok Sabha Election 2024 : भव्य शक्ती प्रदर्शनात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

स्वालिया न. शिकलगार

कल्याण : पुढारी वृत्तसेवा – शिवसेना शिंदे गटाची प्रतिष्ठेची असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे गुरुवारी सकाळी डोंबिवली गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरातील श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर शक्ती प्रदर्शन करत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित भव्य रॅली काढून दुपारी महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (Lok Sabha Election 2024) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या सहकुटुंबाच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णायक अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे दाखल केला. (Lok Sabha Election 2024)

यावेळी पी. डब्ल्यू.डी. मंत्री रवींद्र चव्हाण, मनसेचे नेते तथा आमदार राजू पाटील यांच्यासह भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट, उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासह भाजपा, शिवसेना शिंदे गट, मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीतर्फे डोंबिवलीतील गणेश मंदिर ते वै. ह. भ. प. सावळाराम महाराज क्रीडापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विविध भाषिक, विविध संस्था, संघटनांचे सदस्य सहभागी झाले होचे. पंजाबी, दाक्षिणात्य, आगरी कोळी बँड पथक, वारकरी संप्रदायाच्या टाळ मृदुंगाच्या गजरात या मिरवणुकीची सुरूवात झाली.

शिवसेना शिंदे गट भाजपा, मनसे व महायुतीतील घटक मित्र पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी शक्तीप्रदर्शन केले.त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीचा माहोल निर्माण झाला होता.

गणेश मंदिरातील श्री गणेशाची पूजा केल्यानंतर या रॅलीला सुरुवात झाली. गणेश मंदिर परिसरातून निघालेली ही रॅली बाजी प्रभू चौक,इंदिरा चौक,चार रस्ता, लोकमान्य टिळक पुतळा, शेलार नाका येथून घारडा सर्कल येथे दाखल झाली. डोंबिवली जिमखाना रस्त्याच्या कडेला भव्य स्टेज उभारून सभेचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. या सभेत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवरांनी भाजप शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांचे वडील एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे, मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे आणि मुलगा रूद्रांश शिंदे असे संपूर्ण शिंदे कुटुंबीयांची विशेष उपस्थित होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कल्याण लोकसभेच्या विकासासाठी निधीची कुठलीही कमी भासू देणार नाही याची खात्री मी देतो, असे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. कामाच्या माध्यमातून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे बूथ लेव्हलला काम करा आणि बूथ जिंका. मतदान वाढेल असे काम केले पाहिजे, तरच डॉ. श्रीकांत शिंदे यांना मताधिक्याचा रेकॉर्ड मोडता येईल, असे आवाहन, यावेळी शिंदे यांनी केले. उन्हाळी सुट्टी आणि लग्न सराईमध्ये काही लोक गावी गेले आहेत. त्या सर्वांना विनंती करून डॉ. श्रीकांत शिंदे यांना मतदान करा, असे आवाहन करायचे आहे. तरच नवा विक्रम आपण नोंदवू. डॉ. श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजे मोदीजींना मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत, महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी २० तारखेपर्यंत मेहनत करायची आहे. २० तारखेनंतर पुढील ५ वर्ष खासदार मेहनत करतील आणि मतदारसंघाची सेवा करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT