Latest

मोठी दुर्घटना : ठाण्यात ४० मजली इमारतीची लिफ्ट कोसळून ६ कामगार ठार, दोन गंभीर जखमी

backup backup

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील बाळकुंम परिसरातील रुणवाल गार्डन, नारायणी स्कूलच्या बाजूला, हायलँड पार्क, याठिकाणी असलेल्या इमारतीची अंडरग्राउंड लिफ्ट कोसळून 6 कामगार ठार झाले. ही भीषण दुर्घटना रविवारी सायंकाळी घडली. जखमी कामगारांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

ठाण्याच्या बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन या नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना लिफ्टचा दोर तुटल्याने हा अपघात घडला. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी बाळकुम अग्निशमन दलाला कळवली. तातडीने बाळकुम अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी ओमकार वैती घटनास्थळी टीमसह पोहोचले. तसेच या घटनेची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी दोन कामगारांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT